विभागीय माहिती
पंचायत समिती, सिल्लोड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. नासेर अहमद खान पठाण

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी

श्री. राजेश धोंडीराम महाजन

पशुसंवर्धन विभाग

तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड

डॉ.विजय सिताराम चव्हाण

MREGS विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-1

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

कृषी विभाग

कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड

श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी

बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (प्र) जि.प.उपविभाग (बांधकाम) सिल्लोड

श्री. राजू भानुदास राजगुरू

पाणीपुरवठा विभाग

उपविभागीय अभियंता, जि.प उपविभाग(ग्रा.पा.पू.)सिल्लोड

श्री. आप्पासाहेब शामराव काटकर

सिंचन विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड

श्रीमती. रुचिका संजय घोगरे

महिला व बाल कल्याण विभाग

बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड

(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

निवडलेला विभाग
सिंचन विभाग
HOD Photo
श्रीमती. रुचिका संजय घोगरे
उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड
संपर्क

-

ruchikaghaghare@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 0
  • भरलेली पदे: 0
  • रिक्त पदे: 0
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : 1) सिंचन तलाव
    योजनेचे निकष : - सिंचन तलाव हे शेतीसाठी किंवा ईतर गरजांसाठी पाणी साठवुन ठेवण्यासाठी बांधलेला एक लहान जलाशय (तलाव) होय, ज्याचा उपयोग पावसाच्या पाण्याव्तिरिक्त पिकांना कृत्रिमरित्या पाणी देण्यासाठी केला जातो. यामध्ये पाणी साठवुन ठेवल्या जाते आणि गरजेनुसार गुरुत्वाकर्षणानुसार कालव्या दवारे शेतात सोडले जाते, खासकरुन जेव्हा पाऊस कमी असतो किंवा अनियमित असतो तेव्हा हे खूप उपयोगी पडतात.
  • योजनेचे नाव : 2) साठवण तलाव
    योजनेचे निकष : साठवण तलाव हे शेतीसाठी किंवा ईतर गरजांसाठी पाणी साठवुन ठेवण्यासाठी बांधलेला एक लहान जलाशय (तलाव) होय, ज्याचा उपयोग पावसाच्या पाण्याव्तिरिक्त पिकांना कृत्रिमरित्या पाणी देण्यासाठी केला जातो. यामध्ये पाणी साठवुन ठेवल्या जाते आणि गरजेनुसार उपसा करुन पाईप दवारे शेतात
    सोडले जाते, खासकरुन जेव्हा पाऊस कमी असतो किंवा अनियमितता असतो तेव्हा हे खूप उपयोगी पडतात
  • योजनेचे नाव : 3) > पाझर तलाव
    योजनेचे निकष : पाझर तलाव हे पावसाचे पाणी वाहुन न जाता जमिनीत मुरवण्यासाठी बांधलेला एक जलाशय (तलाव) होय, पावसाचे पाणी अडवुन साठवुन ते हळूहळू जमिनीत मुरविले जाते, यामुळे भूजल पातळी वाढते, निम्न बाजुच्या विहीरींची पाणी पातळी वाढते याचा सिंचना साठी व पिण्याचे पाण्यासाठी फायदा होतो. ही पाणी टंचाई कमी करण्यासाठी एक महत्तवाची जलसंधारणाची पदधत आहे.
  • योजनेचे नाव : 4) कोल्हापुरी बंधारा
    योजनेचे निकष : > कोल्हापुरी बंधारा म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये दगडी / सिमेंट बांधकाम करुन आणि त्यावर लोखंडी दरवाजे बसवुन पाणी अडवणारे एक सिंचन साधन आहे, जे पावसाळ्यातील पाणी अडवून ठेवते आणि उन्हाळ्यात उपसा पध्दतीने शेतीसाठी वापरले जाते. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणे आणि ते उपसा सिंचनाद्वारे शेतीसाठी वापरणे, तसेच पूर नियंत्रणात मदत करणे हा बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
  • योजनेचे नाव : 5) साठवण बंधारा
    योजनेचे निकष : > साठवण बंधारा हा एक प्रकारचा चेक डॅम असून पावसाचे पाणी साठवण्यासाठी, भूजल पुनर्भरण करण्यासाठी आणि सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवण्यासाठी बांधला जातो. ग्रामीण भागात शाश्वत पाणी व्यवस्थापणासाठी साखळी साठवण बंधारा ही स्थानिक पाण्याची महत्वाची पायाभूत सुविधा आहे.
  • योजनेचे नाव : 6) अस्तित्वातील योजनातील गाळ काढणेः
    योजनेचे निकष : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही एक प्रमुख योजना असून ज्याचा उद्देश तलावामधील गाळ काढून तो शेतांमध्ये वापरणे, जलसाठा वाढवणे आणि जमिनीची सुपीकता सुधारणे हा आहे. या योजनेत धरणांमधील गाळ काढला जातो आणि त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो तसेच जलसंधारणाची कामे केली जातात ज्यामुळे विहींरीमध्ये पाणी टिकून राहते.
  • योजनेचे नाव : 7) नाला खोलीकरण
    योजनेचे निकष : नाला खोलीकरण व रूंदीकरण या योजने अंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढून त्यांची खोली वाढवली जाते, ज्यामुळे पाणी जास्त काळ साठून राहते आणि दुष्काळी परिस्थितीत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. गाळ काढल्यामुळे नाल्यांची वहन क्षमता वाढते.
  • योजनेचे नाव : 8) अस्तित्वातील योजनांची देखभाल व दुरूस्ती
    योजनेचे निकष : उपविभागा मार्फत अस्तित्वात असलेले सिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, कोल्हापूरी पदधतीचे बंधारे, साठवण बंधारे इत्यादी योजनांची देखभावल व दुरुस्ती करण्यात येते.