विभागीय माहिती
पंचायत समिती, सिल्लोड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. नासेर अहमद खान पठाण

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी

श्री. राजेश धोंडीराम महाजन

पशुसंवर्धन विभाग

तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड

डॉ.विजय सिताराम चव्हाण

MREGS विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-1

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

कृषी विभाग

कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड

श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी

बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (प्र) जि.प.उपविभाग (बांधकाम) सिल्लोड

श्री. राजू भानुदास राजगुरू

पाणीपुरवठा विभाग

उपविभागीय अभियंता, जि.प उपविभाग(ग्रा.पा.पू.)सिल्लोड

श्री. आप्पासाहेब शामराव काटकर

सिंचन विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड

श्रीमती. रुचिका संजय घोगरे

महिला व बाल कल्याण विभाग

बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड

(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

निवडलेला विभाग
शिक्षण विभाग
श्री. राजेश धोंडीराम महाजन
गट शिक्षण अधिकारी
संपर्क

9421426497

rdmahajan69@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 0
  • भरलेली पदे: 0
  • रिक्त पदे: 0
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनानांचा तपशील
    योजनेचे निकष : गटसाधन केंद्र अनुदान
    औरंगाबाद जिल्ह्यातील 09 गटसाधन केंद्रांना सादिल खर्चासाठी प्रती गटसाधन केंद्र रु. 27000/-, व बैठक प्रवास भत्ता यासाठी रु. 30000/-, अध्ययन-अध्यापन साहित्य अनुदान यासाठी रु. 10000/-, याप्रमाणे निधी वितरीत करण्यात येतो. तसेच गटसाधन केंद्रस्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत साधनव्यक्ती, विशेष तज्ञ, वरिष्ठ लेखा सहायक, डाटा एंट्री ऑपरेटर, एम.आय.एस. कोऑर्डिनेटर यांचे मासिक मानधनासाठी सदरच्या मंजूर निधीतून खर्च करण्यात येतो.

    समुहसाधन केंद्र अनुदान :-
    जिल्हा परिषदेच्या एकूण 128 व समुह साधन केंद्रांना सादील खर्चासाठी प्रती समूह साधन केंद्र रु.15,000/-, बैठक व प्रवास भत्ता रु.15,000/-प्रती समूह साधन केंद्र, अध्ययन-अध्यापन साहित्य अनुदान रुपये 5000/- व समूहसाधन केंद्र सक्षमीकरण केंद्रातील शाळानिहाय रुपये 700/- प्रती प्रमाणे वितरीत करण्यात आलेले आहे.

    संयुक्त शाळा अनुदान(प्राथमिक):-
    जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.5000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु.12500/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.25000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.37500/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.5000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु.12500/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.25000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.37500/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.

    शाळा अनुदान माध्यमिक :-
    जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.5000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु.12500/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.25000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.37500/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.

    समावेशित शिक्षण उपक्रम
    1) अंशत: अंध एकूण 260 विद्यार्थ्यांना नियमित पाठयपुस्तकांप्रमाणे मोठया अक्षरातील पुस्तके वितरण करण्यात आलेले आहे. 2) तालुका व जिल्हा स्तरावर अपंग (दिव्यांग) मुलांसाठी वय 3 ते 6 व 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करणे. राष्ट्रीय आरोग्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय तज्ञांच्या मार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करणे.3) बालकांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येतात किंवा पुर्णवेळ देखभाल करावी लागते. अशा 538 बालकांना मदतनीस भत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.4) विशेष गरजा असणाऱ्या 457 बालकांना प्रवासभत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.5) विशेष गरजा असणाऱ्या 390 विद्यार्थीर्नींना शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन भत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.6) सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नवी दिल्ली व मानव संसोधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अधिनस्त असलली स्वायत्ता संस्था अलिम्को यांच्या मार्फत जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजित करुन 6 ते 18 वयोगटातील अस्थिव्यंग, बहुविकलांग, मेंदुचा पक्षघात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्रायसिकल, व्हिलचेअर, कुबडया, वाकर निश्चिती श्रवणयंत्र ब्रेल किट, अंध काठी, MR किट निश्चित करणेबाबत 175 लाभर्थ्याना उपलब्ध करुन देण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

    वाहतूक सुविधा
    समग्र शिक्षा अंतर्गत रिमोट एरिया मधील विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी शासनाच्या निकषानुसार वाहतूक सुविधा पुरविण्यात येते. नजीकच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत, अशा वस्त्यांमधील 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ मोफत परिवहन सुविधा किंवा अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी तरतूद आहे. इयत्ता 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांच्या वस्थानाच्या(निवासस्थान) 1कि.मी. च्या परिसरात, इयत्ता 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानाच्या 3 कि.मी. च्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यास्तव वाहतुक भत्ता देण्याची तरतूद आहे.
    वाहतूक सुविधाबाबतचे निकष
    1) गावात कोणतीही शाळा नसणे.
    2) ठराविक माध्यमाची शाळा उपलब्ध नसणे.
    3) गावात शाळा आहे, मात्र पाचवी / आठवीचा वर्ग उपलब्ध नाही.
    4) Children from extremely deprived communities (शाळापासूनचे अंतर खुपच लांब असणे.)
    5) 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेचे समायोजनामुळे शाळा उपलब्ध नसणे.
    6) शाळा उपलब्ध आहे मात्र मॉडेल स्कूलमध्ये जाण्याकरिता वाहतूक सुविधा (Neighbourbood School available but transportation required to go to Model School).
  • योजनेचे नाव : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
    योजनेचे निकष : इयत्ता 5 वी. ते 10 वी वर्गात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील मुलींसाठी सदर योजना लागू आहे.
    इयत्ता 5 वी. ते 7 वी साठी दरमहा ६० रु प्रमाणे एकूण १० महिन्यासाठी ६०० रु इतकी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते.
    इयत्ता 8 वी. ते 10 वी साठी दरमहा 100 रु प्रमाणे एकूण १० महिन्यासाठी 1000रु इतकी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते.