विभागीय माहिती
पंचायत समिती, सिल्लोड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. नासेर अहमद खान पठाण

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी

श्री. राजेश धोंडीराम महाजन

पशुसंवर्धन विभाग

तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड

डॉ.विजय सिताराम चव्हाण

MREGS विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-1

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

कृषी विभाग

कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड

श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी

बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (प्र) जि.प.उपविभाग (बांधकाम) सिल्लोड

श्री. राजू भानुदास राजगुरू

पाणीपुरवठा विभाग

उपविभागीय अभियंता, जि.प उपविभाग(ग्रा.पा.पू.)सिल्लोड

श्री. आप्पासाहेब शामराव काटकर

सिंचन विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड

श्रीमती. रुचिका संजय घोगरे

महिला व बाल कल्याण विभाग

बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड

(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

निवडलेला विभाग
आरोग्य विभाग
HOD Photo
डॉ. नासेर अहमद खान पठाण
तालुका आरोग्य अधिकारी
संपर्क

9860628316

thosillod2025@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 259
  • भरलेली पदे: 170
  • रिक्त पदे: 89
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : 1. प्रधानमंत्री मातृवंदना योजना
    योजनेचे निकष : उद्देशः
    गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे.
    माता व बाल आरोग्य सुधारणे.
    लाभार्थीः
    पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे.
    ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे.
    अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.
    पात्र लाभार्थी ज्यांच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहे.
    ज्या महिला अंशतः (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
    बी.पी.एल. रेशनकार्ड असलेली महिला.
    प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी.
    ई-श्रम कार्ड असलेली महिला.
    किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
    मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला.
    अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका
    लाभाचे स्वरूपः
    पहिल्या अपत्यासाठी :
    पहिला हप्ता - रु.3,000/-
    6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी. किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करुन घेणे आवश्यक.
    दुसरा हप्ता - रु.2,000/-
    बालकास पेंटा - 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. (14 आठवड्यांपर्यंत)
    दुसऱ्या अपत्यासाठी : (मुलगी असेल तर) एक रकमी रु. 6,000/-
    जन्म दाखला असणे आवश्यक व बालकाचे पेंटा 3 पर्यंतचे (14 आठवडे) लसीकरण झालेले असणे आवश्यक
    आवश्यक कागदपत्रेः
    लाभार्थीचे आधार कार्ड
    गरोदरपणाचे नोंदणीचे कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड
    लाभार्थीचे आधार कार्ड जोडलेले व DBT स्नेही बँक खाते
    माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
    जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
    अधिक माहितीसाठी 14408 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा.
  • योजनेचे नाव : 2. जननी सुरक्षा योजना
    योजनेचे निकष : उद्देशः
    . माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
    महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे.
    लाभार्थीः
    अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला
    लाभाचे स्वरूपः
    बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये.
    बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकीत आरोग्य केंद्रात झाल्यास
    अ) शहरी भागात - रु. 600/-
    ब) ग्रामीण भागात- रु. 700/-
    . सिझर झाल्यास रु. 1500/-
    सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर डी.बी.टी., पी.एफ.एम.एस.द्वारे देण्यात येतो.
    आवश्यक कागदपत्रेः
    MCP कार्ड आणि RCH नंबर
    बाळंत महिलेचे बँक पासबुक
    माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
    जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
    104 या हेल्पलाईनवर फोन करा.
  • योजनेचे नाव : 3. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
    योजनेचे निकष : उद्देशः
    महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे.
    सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अंगीकृत रुग्णालयांच्या माध्यमातून विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य संरक्षण.
    कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
    लाभार्थी:
    महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे असे कुटुंब.
    लाभाचे स्वरूपः
    वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब विमा संरक्षण.
    मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीच्या शस्त्रक्रियेचा समावेश.
    . योजनेंतर्गत उपचारांसाठी सर्व लाभार्थी पात्र.
    शासकीय/खासगी अंगीकृत रुग्णालयात निःशुल्क लाभ घेण्याची सुविधा.
    आवश्यक कागदपत्रेः
    पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका.
    अर्जदाराचे आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड इ.
    माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त 'आरोग्य मित्र'
    हेल्पलाईन क्र.: 155388/18002332200
  • योजनेचे नाव : 4. आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
    योजनेचे निकष : उद्देशः
    भारत सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना.
    सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांच्या माध्यमातून विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य विमा.
    कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
    लाभार्थीः
    सन 2011 च्या "सामाजिक, आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील" पात्र कुटुंब.
    अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब.
    ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून सदर योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात.
    लाभाचे स्वरूपः
    वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब रु. 5,00,000/- पर्यंत
    आवश्यक कागदपत्रेः
    वर नमूद केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड
    द्वारे केवायसी करून आयुष्मान भारत
    योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक.
    माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त 'आरोग्य मित्र'
    हेल्पलाईन क्र. - 14555/1800111 565
  • योजनेचे नाव : 5. निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार
    योजनेचे निकष : उद्देशः
    धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळणे.
    कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
    एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा मोफत व 10 टक्के खाटा 50% सवलतीच्या दरात रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी राखून ठेवणे.
    लाभार्थी:
    ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पत्र 3 लाख 60 हजारांपेक्षा कमी आहे असे सर्व नागरिक.
    लाभाचे स्वरूपः
    ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख 80 हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना धर्मादाय रुग्णालयांत मोफत उपचार.
    ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 3 लाख 60 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना धर्मादाय रुग्णालयांत 50% सवलतीच्या दरात उपचार.
    आवश्यक कागदपत्रेः
    पिवळे रेशन कार्ड किंवा वरील रकमेचा वार्षिक उत्पन्न दाखला असणारे नागरिक.
    रुग्णाचे आधार कार्ड.
    माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    धर्मादाय रुग्णालयात नियुक्त 'आरोग्य मित्र'
    किंवा मेडिकल सोशल वर्कर.